गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा  - ABSTUDIO.CO.IN
चैत्राची सोनेरी पहाट
नव्या स्वप्नांची नवी वाट
नवा आरंभ, नवा विश्वास,
नव-वर्षाची हीच तर खरी सुरुवात!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
नवीन वर्षाची नवी ही सुरुवात,
सुरुवात करु नवीन क्षणांची
या मंगल दिनाच्या तुम्हांला हार्दिक शुभेच्छा!
श्रीखंड पुरी
रेशमी गुढी
लिंबाचे पान,
नव वर्ष जावो छान!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
शांत निवांत शिशीर सरला,
सळसळता हिरवा वसंत आला,
कोळीळेच्या सुरुवाती सोबत,
चैत्र-पाडवा दारी आला!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत नव वर्षाचे, आशा – आकांक्षांचे
सुख – समृद्धीचे, पडता पाऊल दारी गुढीचे
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
भल्या सकाळी, गुढी उभारू
नवं वर्षाचे करू स्वागत
सामील होऊ शोभायात्रेत
आनंदाची उधळण करीत
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
मिळूनी आपण गुढी उभारू, होऊनी सारे एक
सर्वीकडे पोचवू आपण, पर्यावरणाचा संदेश
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सर्व रस्ते सजले आहेत,
छान सुंदर रांगोळ्यांनी.
शोभा यात्रा फुलुनी गेली,
माणसांच्या ताटव्यानी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
झाड तोडूनी, प्रदूषण वाढवूनी,
काय कोणी मिळविले?
पूर, दुष्काळ, वादळात
सर्वस्व गमाविले…….
थांबुवया हे सारे आपण,
करुनी पुन्हा वृषारोपण.
झाडे लावू, झाडे जगवू,
वसुंधरेला पुन्हा सजवू.
पर्यावरणाच्या गुढीसंगे,
करू नववर्षाचे स्वागत.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
चला उभारू पुन्हा आता,
पर्यावरणाची गुढी.
स्वागत करू नववर्षाचे,
पोचवू हा संदेश घरोघरी.
“गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा”
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
Share on Google Plus

About Design Team

Google+ Badge

Photo Album

AB Studio Interior Designing Companies in Mumbai 061

Popular Links